Anuradha Vipat
सिझेरियन डिलिव्हरीमध्ये पडणाऱ्या टाक्यांची संख्या ही जखमेच्या आकारावर आणि प्रकारावर अवलंबून असते.
सिझेरियनमध्ये बाहेरच्या त्वचेवर ५ ते ७ टाके किंवा काही वेळा त्यापेक्षा जास्त टाके पडू शकतात.
सिझेरियनमध्ये वरच्या त्वचेलाच नाही तर आतल्या ७ विविध थरांना टाके घातले जातात .
हे टाके विरघळणाऱ्या धाग्यांपासून बनवलेले असतात, जे शरीरात आपोआप विरघळतात.
त्वचेवरील टाके हे टाके काढण्यायोग्य असू शकतात किंवा आपोआप विरघळणारेही असू शकतात.
जर टाके काढण्यायोग्य असतील तर शस्त्रक्रियेनंतर साधारणतः ५ ते ७ दिवसांनी ते काढले जातात.
वरची जखम साधारणपणे २ ते ३ आठवड्यांत भरते परंतु शरीरातील अंतर्गत जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी ६ ते ८ आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो