Mahesh Gaikwad
वाढत्या वयासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या सुरू होतात.
वयाच्या तीशीनंतर कमजोर हाडे, स्नायूंचे दुखणे यासह मानसिक ताणतणाव या सारख्या आरोग्याच्या समस्या सुरू होतात.
अशा परिस्थितीमध्ये स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी योगासने तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात.
वयाच्या तीशीनंतर नियमित योगासने केल्यामुळे शरीर लवचिक आणि निरोगी राहण्यास मदत होते. तसेच मानसिक आरोग्यही सुधारते.
हे आसन केल्यामुळे मनाची एकाग्रता वाढते. तसेच हे आसन पाय, पोट आणि पाठीच्या समस्यांसाठी उपयुक्त आहे.
वाढत्या वयामुळे स्नायूं अखडतात. अखडलेले स्नायू पुन्हा सक्रिय करण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरते.
हे आसन केल्यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो तसेच पचनक्रियाही सुधारते. याच्या नियमित अभ्यासामुळे पाठीचे दुखणे कमी होते.
या आसनामुळे मांड्या मजबूत होऊन त्यांची ताकद वाढते. तसेच बध्दकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.