Jaggery market : पिवळाधम्मक गुळ आरोग्यासाठी चांगला असतो का?

Team Agrowon

गुळाच्या सध्याच्या विक्री व्यवस्थेत गुळाची प्रथमदर्शनी पसंती तसेच गुळाला बाजारात मिळणारा दर हा गुळाच्या रंगावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे.

Jaggery market | Agrowon

गुळ उत्पादक गुळाला गडद पिवळा रंग येण्यासाठी हैड्रॉस, वाफा पावडर, भेंडी पावडर इ. रासायनिक पदार्थांचा अतिरिक्त वापर करतात.

Jaggery market | Agrowon

हे रासायनिक पदार्थ मानवी आरोग्याला  हानीकारक आहेत. या रासायनिक पदार्थांच्या वापरामुळे गुळातील गंधकाच प्रमाण वाढत. 

Jaggery market | Agrowon

अन्न भेसळ कायद्यानुसार गुळामध्ये सल्फरडाय ऑक्साईडच प्रमाण ७० भाग प्रति दशलक्ष (पीपीएम) पेक्षा जास्त असू नये.

Jaggery market | Agrowon

हैड्रॉसच्या अतिवापराने सोडीयमच प्रमाण वाढत त्यामुळे हवेतील बाष्प गुळात शोषले जाऊन हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढताच गुळाला पाणी सुटते व त्यात बुरशीची वाढ होते.

Jaggery market | Agrowon

असा गुळ खाण्याच्या दृष्टीने हानीकारक असतो. यासाठी गुळ तयार करताना रासायनिक पदार्थांचा वापर टाळणंच हितकारक आहे.

Jaggery market | Agrowon

गुळ आकर्षक दिसण्यासाठी अनेक गुळउत्पादक  रसायनांचा वापर करतात. त्यामुळे गुळाला पाणी सुटणे, बुरशी लागणे या सारख्या समस्या उद्भवतात. 

Jaggery market | Agrowon