Team Agrowon
तेलाव्यतीरिक्त करडईचे इतरही उपयोग आहेत.करडईच्या प्रत्येक भागावर प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादने तयार केली जातात.
पाकळ्यांचा उपयोग रंगनिर्मिती, सौंदर्यप्रसाधने आणि औषधनिर्मितीसाठी केला जातो.
करडईच्या वाळलेल्या काडाचा वापर कार्ड बोर्ड उद्योगामध्ये, क्राफ्ट पेपर, पार्टिकल बोर्ड उद्योगात तसच कंपोस्ट तयार करण्यासाठी होतो.
करडईच्या चाऱ्यामध्ये ओट आणि बरसीम इतकेच पौष्टिक गुणधर्म आढळतात. तेल काढल्यानंतर उरलेल्या करडई पेंडीचा उपयोग पशूखाद्य म्हणून करता येतो.
करडईच्या फुले आणि पाकळ्या औषधी असतात. परदेशामध्ये करडईच्या पाकळ्यांचा उपयोग चहासाठी केला जातो.
करडईचे तेल कमी तापमानात देखील उत्तम राहत असल्यामुळे थंड पदार्थांमध्ये ते वापरले जाते.साबण उद्योग, वंगण, ग्रीसिंग ऑइल इत्यादींमध्ये करडई तेलाचा उपयोग होतो.
टरफलांचा उपयोग कागद उद्योग,वीटभट्टी,टाइल्स आणि पोलाद उद्योगामध्ये केला जातो.