sandeep Shirguppe
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री देशाचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती आहे.
कट्टर काँग्रेस विचारसरणीचा पगडा ते पेशाने वकील म्हणून यशवंतराव चव्हाण यांची ओळख आहे. त्यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला.
महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी ते मुंबईचे मुख्यमंत्री तर काँग्रेसचे राज्य नेते म्हणून पदभार स्वीकारला यानंतर १९६० मध्ये ते पहिले मुख्यमंत्री बनले.
यशवंतराव चव्हाण यांना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निकटवर्तीय मानले जात होते.
संरक्षण, गृह, परराष्ट्र तसेच अर्थ खात्याचे केंद्रीय मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी काम केले.
राजकारणाबरोबर यशवंतराव चव्हाण हे प्रसिद्ध लेखकही होते. त्यांनी मराठी साहित्य मंडळाची स्थापना करत अनेक कवी आणि लेखकांशी संवाद ठेवला.
यशवंतराव चव्हाण यांचे २५ नोव्हेंबर १९८४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
यशवंतराव चव्हाण यांनी सुमारे पाच दशके भारतीय राजकारणात सक्रिय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे योगदान युगानुयुगे स्मरणात राहणारे आहे.