Anuradha Vipat
दिवाळीतील नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी यमराजासाठी दिवा लावण्याची प्राचीन परंपरा आहे.
हिंदू शास्त्रानुसार, या दिवशी योग्य पद्धतीने दीपदान केल्याने कुटुंबातील सदस्यांवरून अकाली आणि अपघाती मृत्यूचे संकट टळते .
चौमुखी दिवा (मातीचा किंवा गव्हाच्या पिठाचा मोठा दिवा)
तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल
कापसाच्या ४ वाती (ज्यामुळे चारही दिशांना ज्योत जळेल)
अक्षता (तांदूळ), फुले आणि कुंकू
दिव्याखाली ठेवण्यासाठी थोडे धान्य (तांदूळ किंवा गहू)
पिठाचा किंवा मातीचा चौमुखी दिवा घेऊन त्यात तेल भरा आणि चारही वाती प्रज्वलित करा. दिव्याला कुंकू, अक्षता आणि फुले वाहून नमस्कार करा.
हा दिवा घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन नमस्कार केल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाबाहेर घेऊन जावा. दिवा नेहमी दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवावा, कारण दक्षिण ही यमराजाची दिशा मानली जाते.
दिवा थेट जमिनीवर न ठेवता खाली तांदूळ किंवा गव्हाची रास ठेवावी आणि त्यावर दिवा ठेवावा. दिवा ठेवताना मनात प्रार्थना करावी: "हे यमदेव, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे अपघाती आणि अकाली मृत्यूपासून रक्षण करा.
दिवा बाहेर ठेवून आल्यानंतर थेट घरात यावे, पाठीमागे वळून पाहू नये.