Instant Mawa Barfi : इन्स्टंट मावा बर्फी: दुधाच्या पावडरीपासून बनवा तोंडात विरघळणारी मऊ बर्फी, कधीही न बिघडणारी रेसिपी!

Anuradha Vipat

चवदार आणि मऊ बर्फी

सणासुदीच्या दिवसांत पाहुण्यांसाठी किंवा गोड खाण्याची इच्छा झाल्यास अवघ्या १० ते १५ मिनिटांत मिल्क पावडर वापरून हलवाई स्टाईल चवदार आणि मऊ बर्फी घरच्या घरी सहज बनवता येते.

Instant Mawa Barfi | agrowon

साहित्य

मिल्क पावडर , दूध, तूप , पिठीसाखर, वेलची पावडर , ड्रायफ्रूट्सचे काप.

Instant Mawa Barfi | agrowon

कृती

कढईमध्ये दूध आणि तूप एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता यामध्ये २ कप मिल्क पावडर थोडी थोडी घालत चमच्याने सतत ढवळत राहा.

Instant Mawa Barfi | agrowon

मंद आचेवर शिजवणे

मिश्रण एकजीव झाल्यावर गॅस अत्यंत मंद आचेवर चालू करा. हे मिश्रण चमच्याने सतत ढवळत ५ ते ७ मिनिटे शिजवून घ्या. हळूहळू या मिश्रणाचा मऊ मावा तयार होईल आणि ते पॅन सोडायला लागेल.

Instant Mawa Barfi | agrowon

साखर आणि वेलची घालणे

मिश्रण पॅन सोडू लागल्यावर गॅस बंद करा. कढई किंचित कोमट झाल्यावर त्यात १/२ कप पिठीसाखर आणि वेलची पावडर घाला. गॅस बंद असतानाच साखर माव्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.

Instant Mawa Barfi | agrowon

बर्फी सेट करणे

एका थाळीला थोडे तूप लावून ग्रीस करा. तयार मिश्रण या ट्रेमध्ये काढून सपाट करा. वरून बदाम आणि पिस्त्याचे काप पसरवून चमच्याने हलके दाबून घ्या.

Instant Mawa Barfi | agrowon

तुकडे पाडणे

हे मिश्रण १ ते २ तास सेट होऊ द्या. बर्फी छान सेट झाल्यावर तिच्या आवडीनुसार वड्या कापून घ्या. तुमची मऊ, रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी इन्स्टंट मावा बर्फी तयार आहे!

Instant Mawa Barfi | agrowon

Vasubaras Wishes : दिवाळीचा पहिला दिवस: वसुबारस निमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश

Vasubaras Wishes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...