World Sparrow Day : का कमी होतोय चिमण्यांचा चिवचिवाट ?

Team Agrowon

चिमणीचे संवर्धन आणि यासाठीच्या लोकचळवळीला बळ देण्याकरिता २० मार्च २०१० पासून जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो.

World Sparrow Day | Agrowon

भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. 

World Sparrow Day | Agrowon

उन्हाळा सुरू झाला आहे, या चिमण्यांसह इतर पक्षांकरिता अन्न-पाण्याची व्यवस्था आपल्या घरपरिसरात अनेक जण करत असतात.

World Sparrow Day | Agrowon

शेतपरिसरात दररोज दिसणारे चिमण्यांचे थवे आता नियमित दिसत नाही, त्यामुळे पिकांवर रोग-किडींचे आक्रमण वाढू लागले आहे.

World Sparrow Day | Agrowon

बदलत्या बांधकामाच्या पद्धतीमूळे चिमण्यांच्या निवासावर देखील परिणाम होत आहे.

World Sparrow Day | Agrowon

कमी होत चाललेली जंगले आणि शहरात निर्माण झालेली मोबाईल टॉवर्स व तारांची जंगले यामुळेही चिमणीला धोका निर्माण झाला आहे.

World Sparrow Day | Agrowon

भारतात पाच प्रजातींच्या चिमण्या आढळून येतात. त्यामध्ये, स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचादेखील समावेश आहे.

World Sparrow Day | Agrowon