Silver Gold Traders : ऐन लग्नसराईत आचारसंहिता, चांदी, सोने व्यापारास फटका

sandeep Shirguppe

लोकसभा निवडणुका

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम अनेक उद्योगांवर होणार आहे.

Silver Gold Traders | agrowon

चांदी उद्योग

कोल्हापुरातील हुपरी परिसरात कोट्यावधींची चांदी व्यापाराची उलाढाल होत असते. परंतु आचारसंहिता काळात यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.

Silver Gold Traders | agrowon

आचारसंहिता

चांदी असोसिएशनकडून याबाबत निवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे कागदपत्रांबाबत मागणी केली होती.

Silver Gold Traders | agrowon

चांदी उद्योग धोक्यात

परंतु याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हुपरी परिसरातील चांदी उद्योग ऐन हंगामात बंद राहण्याची भीती आहे.

Silver Gold Traders | agrowon

कारागिरांवर संकट

या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या हजारो कारागिरांवर बेकारीचे संकट उभे राहणार आहे.

Silver Gold Traders | agrowon

निवडणूक आयोगाने दखल घ्यावी

कारागीरांचा विचार करून चांदी उद्योग चालू राहण्यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शन करण्याची विनंती होत आहे.

Silver Gold Traders | agrowon

तपासणी नाक्यांवर त्रास

लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर देशभर निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी नाके उभारले जातात.

Silver Gold Traders | agrowon

नाहक त्रास

सर्वसामान्य नागरिक, व्यापारी तसेच बँकांचा पैसे दागिणे पकडण्याच्या घटना वारंवार घडताना दिसतात.

Silver Gold Traders | agrowon

तयार माल पडून

या भीतीतून हुपरी परिसरातील चांदी उद्योजक ऐन हंगामात दागिन्यांची मागणी असून सुद्धा बाजारपेठेत माल घेऊन जाण्यास इच्छुक नाहीत.

Silver Gold Traders | agrowon

लग्नसराई हंगाम

ज्या काळात आचारसंहिता आहे त्याच काळात लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. याचा थेट परिणाम सोने, चांदीच्या मागणीवर होणार आहे.

Silver Gold Traders | agrowon

कोणीच दखल घेत नाही

दरम्यान याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करूनही काही निष्पण्ण झाले नाही.

Silver Gold Traders | agrowon