Sanjana Hebbalkar
आज जगभरात जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. लोकांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल चर्चा होणं महत्त्वाचं आहे
प्रत्येक व्यक्तीचं मानसिक आरोग्य चांगलं असणं हा त्याचा अधिकार आहे.
प्रत्येक वर्षीच्या या दिवसाची एक थीम असते. यावर्षी मानसिक आरोग्य हा सार्वत्रिक मानवी हक्क आहे अशी आहे.
त्यामुळे प्रत्येकाच्या मानसिक आरोग्याला प्रोत्साहन आणि संरक्षण देणाऱ्या गोष्टी करणं गरजेचं आहे.
आपण आपल्या दैनंदिन जीवनात सामोरे जात असलेल्या ताणतणावाला ओळखून त्याला सामोरं जाणं आणि आरोग्य नीट राखणं.
या दिनाबद्दलं बोलणं, याच्याविषयी समजून घेणं, लोकांना जागृत करणं हे आजच्या दिवशी आपण करू शकतो
1992 मध्ये वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ काँग्रेसमध्ये मानसिक आरोग्याचा समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी एक दिवस पाळण्याची संकल्पना मांडण्यात आली