Mahesh Gaikwad
आजच्या ऑफिस कल्चरच्या वर्क लाईफमध्ये अनेकजण एकाच जागी तासनतास खुर्चीत बसून काम करतात. परंतु याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून काम केल्यामुळे लठ्ठपणा, पाठदुखी, आणि मानसिक ताण असे आजार होऊ शकतात.
जास्तवेळ खुर्चीत बसून काम केल्यामुळे पाठीच्या कण्यावर ताण येतो. परिणामी पाठीचा आणि कंबरदुखीचा त्रास वाढू शकतो.
एकाच जागी बसून राहिल्याने शारीरिक हालचाल कमी होते. त्यामुळे कॅलरी जळत नाही. त्यामुले वजन आणि लठ्ठपणा वाढतो.
जास्तवेळ एकाच जागी बसून काम केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम होतो. त्यामुळे ह्रदयविकाराचा धोका वाढतो.
एकाच जागी बसून राहिल्यामुळे शरीरातील रक्ताच्या साखेरचे नियमन बिघडते. परिणामी मधुमेहाचा धोका वाढतो.
शारीरिक हालचाल कमी झाल्याने तणाव, चिंता आणि डिप्रेशनसारख्या समस्या वाढतात.
या समस्या टाळण्यासाठी कामा करताना छोटासा ब्रेक घ्या. थोड्या-थोड्या वेळाने उठून चालणे, स्ट्रेचिंग करणे सारख्या हालचाली कराव्या.