Anuradha Vipat
उपवास आणि वर्कआऊट एकत्र करणे हे पूर्णपणे तुमच्या शरीराची क्षमता आणि तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यायाम करता यावर अवलंबून असते.
रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने शरीर साठवलेली चरबी ऊर्जेसाठी वापरते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
उपवास आणि व्यायामामुळे शरीराची इन्सुलिन कार्यक्षमता सुधारते.
जर तुम्ही योगा, चालणे किंवा हलके स्ट्रेचिंग करत असाल, तर उपवासाच्या दिवशी ते करणे सुरक्षित असते.
उपवासात जड वजन उचलणे किंवा वेगाने धावणे यामुळे चक्कर येऊ शकते किंवा स्नायूंची हानी होऊ शकते.
उपवासात पाणी कमी पिल्याने आणि व्यायामात घाम आल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवू शकतो.
उपवास सोडण्याच्या १-२ तास आधी किंवा उपवास सोडल्यानंतर व्यायाम करणे उत्तम आहे.