Anuradha Vipat
महिलांच्या आरोग्यासाठी 'धणे आणि जिरे' यांचे डिटॉक्स पाणी एखाद्या अमृतासारखे काम करते.
धण्यामध्ये असे घटक असतात जे अंतःस्त्रावी ग्रंथींना उत्तेजित करतात, ज्यामळे हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते.
ज्या महिलांना मासिक पाळीच्या वेळी खूप वेदना होतात किंवा पाळी अनियमित येते, त्यांच्यासाठी हे पाणी गुणकारी आहे.
जिरे चयापचय क्रिया वेगवान करतात, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते.
शरीरातील विषारी घटक बाहेर काढल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचा चमकदार होते
हे पेय प्यायल्याने पचन संस्था मजबूत होते .
सकाळी रिकाम्या पोटी धण्याचे पाणी पिणे थायरॉईडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते.