Anuradha Vipat
प्रोफेशनल अपीअरेंसला मेंटेन करणे खूप महत्वाचे असते . तर आज आपण पाहणार आहोत वर्किंग वुमनसाठी काही स्टायलिंग टिप्स.
कामाच्या ठिकाणी नेहमी प्रोफेशनल आणि आरामदायी कपडे घाला. राखाडी, बेज, ऑफ-व्हाइट, निळा इत्यादी पेस्टल शेड्स ऑफिससाठी चांगले असतात.
बेली फ्लॅट्स, लो-हिल्ड पंप्स किंवा स्मार्ट सँडल यासारखे फुटवेअर घाला.
कामाच्या ठिकाणी आणि अॅक्सेसरीज घाला. ऑफिसमध्ये घालण्यासाठी हलके कानातले, साधे घड्याळ किंवा पातळ चैन योग्य आहे
बॅग अशी असावी की ती लेदर टाईप बॅग किंवा बॅकपॅकसारखा प्रोफेशनल लूक देईल.
तुमची हेअरस्टाईल क्लीन आणि व्यवस्थित ठेवा. प्रोफेशनल लूकसाठी पोनीटेल, बन किंवा सरळ केस परफेक्ट आहेत.