Anuradha Vipat
स्त्रियांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी खालील गोष्टी करणे अत्यंत आवश्यक आहे.
स्त्रिया अनेकदा कुटुंबाच्या काळजीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. असे करणे भविष्यात मोठे आजार ओढवून घेऊ शकते.
अंघोळीनंतर केस पूर्ण कोरडे न करता बांधल्याने कोंडा आणि टाळूचे संसर्ग होऊ शकतात.
पाळीच्या दरम्यान शरीराला विश्रांतीची गरज असते. या काळात खूप जड कामे किंवा अतिव्यायाम करणे टाळावे.
घराच्या जबाबदाऱ्यांमुळे झोप कमी घेणे मानसिक तणाव आणि हार्मोनल असंतुलनास कारणीभूत ठरते.
सौंदर्य प्रसाधनांचा किंवा स्वस्त कॉस्मेटिक्सचा अतिवापर त्वचेसाठी घातक ठरू शकतो .
उपाशी पोटी राहणे किंवा सतत डाएटिंगच्या नावाखाली जेवण टाळणे यामुळे पित्त आणि अशक्तपणा वाढतो.