Anuradha Vipat
मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर अनेक आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.
मासिक पाळीच्या वेळी महिलांनी त्यांनी घेतलेले पॅड दर 4-6 तासांनी बदलले पाहिजे
मासिक पाळी दरम्यान खूप वेदना होत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक गोळ्या घ्या.
मासिक पाळीत महिलांनी सॅनिटरी पॅड, टॅम्पन्स, मासिक पाळीचे कप यांसारखे स्वच्छ आणि आरामदायी सॅनिटरी नॅपकिन्स वापरावे
मासिक पाळीच्या वेळी महिलांनी योनी स्वच्छ ठेवण्यासाठी ती कोमट पाण्याने धुवा आणि नियमितपणे आंघोळ करा
मासिक पाळीच्या वेळी महिलांनी सुती कपडे वापरावीत जेणेकरून हवा खेळती राहील आणि संसर्ग टाळता येईल.
मासिक पाळीदरम्यान संतुलित आहार घेणे आवश्यक आहे, ज्यात फळ, भाज्या, प्रथिने आणि जीवनसत्वे यांचा समावेश असावा.