Anuradha Vipat
महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असण्यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत.
संशोधनानुसार महिलांचा मेंदू पुरुषांच्या तुलनेत एकाच वेळी अनेक कामे करण्यासाठी जास्त सक्रिय असतो.
महिला दिवसभर घर, नोकरी आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांच्या मेंदूचा अधिक जास्त वापर करतात.
दिवसभर मेंदूचा जास्त वापर झाल्यामुळे त्याची झीज भरून काढण्यासाठी जास्त झोपेची आवश्यकता असते.
एका अभ्यासानुसार महिलांना पुरुषांपेक्षा सरासरी २० मिनिटे जास्त झोपेची गरज असते.
महिलांच्या शरीरात मासिक पाळी, गर्भधारणा , आणि रजोनिवृत्ती यांमुळे हार्मोनमध्ये मोठे बदल वारंवार होतात.
हार्मोनल बदल महिलांच्या झोपेच्या चक्रावर परिणाम करतात. ज्यामुळे त्यांना जास्त झोप लागते.