Women Impowerment : बचत गटांच्या महिलांना मिळणार रोजगार ; शासन शिवून घेणार गणवेष

Team Agrowon

शासनाने यंदाच्या नवीन शैक्षणिक सत्रापासून गणवेष शिवण्याच्या संदर्भातील धोरणात बदल केला आहे.

Women Impowerment | Agrowon

ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांना रोजगाराची संधी मिळावी आणि विद्यार्थ्यांनाही गावातच गणवेष मिळावा, यासाठी आता बचत गटांकडून गणवेष शिवून घेतले जाणार आहेत.

Women Impowerment | Agrowon

शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुलांकरिता आता दरवर्षी दोन मोफत गणवेष देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

Women Impowerment | Agrowon

संबंधित बचत गटांच्या महिलांकडून शाळेत जाऊन गणवेषाची मापे घेतली जातील. त्यामुळे विनामापाचे गणवेष बंद होऊन विद्यार्थ्यांना योग्य मापाचे गणवेष मिळणार आहेत. तसेच मापातील त्रुटी गावातच दूर होण्यास मदत होणार आहे.

Women Impowerment | Agrowon

विद्यार्थ्यांना गणवेष पुरविण्यासाठी राज्याचे कंत्राट मे. पद्मचंद मिलापचंद जैन यांना देण्यात आले आहे. त्यांना विविध मापात कापड पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राप्त कापड महिला बचतगटांना देऊन त्यांच्याकडून गणवेष शिवून घेतले जातील.

Women Impowerment | Agrowon

एक गणवेष शिवून देण्यासाठी बचत गटांच्या महिलांना ११० रुपयांचा मोबदला देण्यात येणार आहे. त्यातून महिलांच्या अर्थकारणाला गती देण्यात येणार आहे.

Women Impowerment | Agrowon