Team Agrowon
जवस हे एक अलीकडच्या काळात सुपर फूड म्हणून पुढे येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यातील अधिक प्रमाणात असलेले ओमेगा-३ स्निग्ध आम्ल, लिग्नीन तंतुमय पदार्थांचे आरोग्यास असलेले फायदे.
जवसामध्ये असणारे प्रथिने रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते. जवसाच्या तेलाचा बेकरी, दुग्धजन्य पदार्थ, फळांचे रस, नूडल्स अशा अनेक खाद्यपदार्थांमध्ये त्यांची पोषण तत्त्वे वाढविण्यास उपयोग केला जातो.
जवसामध्ये ओमेगा-३ स्निग्ध आम्ल जसे की, अल्फा लिनोलेनिक आम्ल, तंतुमय पदार्थ, प्रथिने आणि अॅन्टीऑक्सिडन्टस हे मुबलक प्रमाणात आहेत.
खाद्य तेलबियांच्या बरोबरीने औषधी, औद्योगिक उपयुक्तता, पशुआहार, झाडाच्या तंतुंपासून कापडनिर्मिती असे जवसाचे उपयोग आहेत.
Linseedजवसाच्या बियांमध्ये तंतुमय पदार्थ आहेत, जे वजन कमी करण्यास मदत करतात. एक उत्कृष्ट पोषक तत्त्व आहे.
जवसामध्ये आहाराच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे पोषक तत्त्वे आहेत. ते ओमेगा ३ स्निग्धाम्ले, अ, ड, इ जीवनसत्त्व आणि कॅल्शिअम फॅास्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत आहे.
रक्तातील कॉलेस्टरॉल कमी करण्यास मदत जवस बियांमधील तंतूमय पदार्थ रक्तात उपस्थित खराब कोलेस्टेरोलला बांधतात आणि शरीरातून ते काढण्यास साहाय्य करतात. वजन आटोक्यात ठेवतात.