Anuradha Vipat
दीर्घकाळ तणावाचा महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खूप गंभीर आणि नकारात्मक परिणाम होतो.
महिलांच्या शरीरात होणारे संप्रेरक बदल आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमुळे त्या तणावाला अधिक संवेदनशील असतात.
दीर्घकाळ तणावामुळे मासिक पाळीत अनियमितता, पीसीओडी किंवा वंध्यत्वाच्या समस्या उद्भवू शकतात.
तणावामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. महिला वारंवार आजारी पडतात.
उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढणे आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
पोटदुखी, अपचन, गॅस किंवा इरिटेबल बाऊल सिंड्रोम सारख्या समस्या निर्माण होतात.
तणावामुळे खाण्याच्या सवयी बदलतात, ज्यामुळे वजन खूप वाढू शकते.