Anuradha Vipat
पूजेमध्ये कलश आणि आंब्याच्या पानांना अतिशय विशेष आणि धार्मिक महत्त्व आहे.
कलश आणि आंब्याची पाने दोन्ही प्रतीके हिंदू धर्मात शुभ मानली जातात .
कलश आणि आंब्याच्या पानांचा प्रत्येक महत्त्वाच्या पूजेमध्ये त्यांचा वापर अनिवार्य असतो.
कलश हे विश्वाचे, तसेच सर्व देवता आणि पवित्र नद्यांचे प्रतीक मानले जाते. कलशात विष्णू, रुद्र आणि ब्रह्मा वास करतात अशी श्रद्धा आहे
पाण्याने भरलेला कलश घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांतता टिकवून ठेवण्यास मदत करतो.
आंब्याची पाने ही गणपतीला प्रिय आहेत आणि ती अडथळे दूर करणारी मानली जातात .
आंब्याचे झाड पवित्र मानले जाते. पानांमध्ये पाणी साचलेले असते जे पूजेदरम्यान पवित्र मानले जाते.