Anuradha Vipat
महिलांच्या नावावर कार घेतल्याचे अनेक फायदे आहेत.
अनेक विमा कंपन्या महिला वाहनधारकांना कार विम्याच्या प्रीमियममध्ये विशेष सवलत देतात.
काही प्रमुख बँका आणि वित्तीय संस्था महिला अर्जदारांना कार कर्जावर कमी व्याजदर देतात.
काही विशिष्ट ठिकाणी किंवा मॉल्सच्या पार्किंगमध्ये महिलांसाठी राखीव जागा असतात.
काही राज्यांमध्ये जर तुम्ही कार महिलेच्या नावावर नोंदणी केली तर रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्कात सवलत दिली जाते.
कार महिलेच्या नावावर असल्याने कायदेशीररित्या त्या कारच्या मालक होतात.
महिलांच्या नावावर कार घेणे हा एक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर निर्णय ठरू शकतो.