Mahesh Gaikwad
शेतीमध्ये महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम दिसतात. पुरूष शेतकऱ्यांप्रमाणेच प्रत्येक शेतकरी कुटुंबातील महिला शेतात राबते.
शेतीमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कृषी सखी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम देशातील महिलांसाठी राबविला जात आहे.
केंद्र सरकारच्या लखपती दिदी योजनेत कृषी सखी योजनेचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत ग्रामीण महिलांचे कौशल्य विकसित करून त्यांना कृषी सखी प्रमाणपत्र दिले जाते.
या योजनेतून ग्रामीण महिलांना जमीन तयारीपासून पीक काढणीपर्यंत शेती पर्यावरणीय संबंधीत सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते.
ग्रामीण भागात गावपातळीवर शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञ उपलब्ध करून देणे, ही योजनेची मूळ संकल्पना आहे.
या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार तर मिळेलच शिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होईल.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने कृषी सखींच्या कमाईची माहितीही शेअर केली आहे. यानुसार, कृषी सखींना वर्षभरात ६० ते ८० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.