Anuradha Vipat
झटपट गोरेपणा देण्याचा दावा करणाऱ्या ब्राईटनिंग क्रीम्सचा वापर महिलांनी अजिबात करू नये.
अशा क्रीम्समुळे सुरुवातीला चेहरा उजळल्यासारखा वाटतो, पण नंतर त्वचेचे कायमस्वरूपी नुकसान होते.
बऱ्याच मेडिकल दुकानांमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणाऱ्या 'फेअरनेस' किंवा 'स्किन ब्राईटनिंग' क्रीम्समध्ये तीव्र स्टेरॉइड्स असतात. यामुळे त्वचा पातळ होते, चेहऱ्यावर नको असलेले केस येतात.
स्वस्त आणि अनब्रँडेड क्रीम्समध्ये झटपट उजळपणा आणण्यासाठी पारा वापरला जातो. पारा त्वचेवाटे शरीरात जाऊन किडनी आणि मज्जासंस्थेला गंभीर इजा पोहोचवू शकतो.
हे रसायन मेलास्मा किंवा काळे डाग घालवण्यासाठी डॉक्टर ठराविक काळासाठीच देतात. याचा सतत किंवा जास्त प्रमाणात वापर केल्यास 'ओक्रोनोसिस' नावाचा त्वचेचा विकार होतो.
सोशल मीडियावर किंवा स्थानिक बाजारात मिळणाऱ्या ज्या क्रीम्सवर घटकांची यादी स्पष्ट नसते आणि '७ दिवसांत गोरे व्हा' असा दावा केला जातो, त्या अत्यंत धोकादायक असतात.
त्वचेचा नैसर्गिक रंग उजळण्यासाठी व्हिटॅमिन-सी , नायसिनामाइड, कोजिक ॲसिड किंवा अल्फा आर्बुटिन असलेले डर्मेटोलॉजिस्ट-मान्य सीरम किंवा क्रीम्स वापरावेत.