Anuradha Vipat
रासायनिक हेअर डाय वापरण्याऐवजी नैसर्गिक उपाय केसांना कोणतीही हानी न पोहोचवता नैसर्गिकरीत्या काळे आणि मजबूत ठेवण्यास मदत करतात.
अकाली पांढरे होणारे केस थांबवण्यासाठी हे घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.
खोबरेल तेलात सुकलेल्या आवळ्याचे तुकडे किंवा आवळा पावडर घालून तेल काळे होईपर्यंत चांगले उकळावे. हे तेल थंड झाल्यावर गाळून केसांच्या मुळांना लावावे.
लोखंडी कढईत मेहंदी, कॉफी पावडर आणि चहाच्या पाण्याचे मिश्रण रात्रभर भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी केसांना लावा. त्यानंतर केसांना गडद काळा रंग येण्यासाठी इंडिगो पावडरची पेस्ट लावा.
मूठभर ताजा कढीपत्ता खोबरेल तेलात घालून पाने काळी होईपर्यंत गरम करा. या तेलाने आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना मसाज करा.
कांद्याचा ताजा रस काढून कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांना लावा आणि ३० मिनिटांनंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.
आहारात हिरव्या पालेभाज्या, आवळा, अक्रोड, बदाम आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा, कारण व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे केस लवकर पांढरे होतात.