Winter Wedding Fashion : हिवाळी लग्नसमारंभात साडीवर मिळवा रॉयल लूक; शाल ड्रेपिंग आणि स्वेटर स्टाइलिंगच्या भन्नाट आयडियाज!

Anuradha Vipat

मोठे आव्हान

हिवाळ्यातील लग्नसमारंभ किंवा ऑफिस पार्टीमध्ये साडी नेसताना थंडीपासून बचाव करणे आणि स्टायलिश दिसणे हे अनेक महिलांसमोर मोठे आव्हान असते.

Winter Wedding Fashion | agrowon

आधुनिक आणि एलिगंट लूक

साध्या स्वेटरऐवजी हाय-नेक ब्लाउज, बेल्टेड शाल आणि केप ड्रेपिंग यांसारख्या लेटेस्ट ट्रेंड्सचा वापर करून तुम्ही साडीवरही अत्यंत आधुनिक आणि एलिगंट लूक मिळवू शकता.

Winter Wedding Fashion | agrowon

हाय-नेक स्वेटर ब्लाउज

साडीच्या पारंपरिक ब्लाउजऐवजी फिटिंगचा हाय-नेक किंवा टर्टलनेक स्वेटर घालणे हा सर्वात सोपा आणि क्लासी पर्याय आहे.

Winter Wedding Fashion | agrowon

बेल्टेड शाल ड्रेपिंग

शाल खांद्यावर नुसती पांघरण्याऐवजी ती एका बाजूने पदरासारखी पिन करा आणि कमरेला स्टायलिश लेदर किंवा मेटॅलिक बेल्ट लावा.

Winter Wedding Fashion | agrowon

केप स्टाइल शाल ड्रेपिंग

लग्नसमारंभात भरजरी बनारसी किंवा पैठणी साडीवर दोन्ही खांद्यांवरून पुढच्या बाजूला केपप्रमाणे शाल पिन करा.

Winter Wedding Fashion | agrowon

क्रॉप्ड स्वेटर किंवा वुलन कार्डिगन

कंबरेपर्यंत लांबी असलेले बटणांचे क्रॉप्ड कार्डिगन साडीवर खूप सुंदर दिसतात. तुम्ही कार्डिगनची वरची दोन बटणे बंद ठेवून किंवा पूर्ण उघडे ठेवून कॅज्युअल व ऑफिस वेअरसाठी छान लेअरिंग करू शकता.

Winter Wedding Fashion | agrowon

लाँग कोट किंवा वुलन ब्लेझर

जर तुम्हाला ऑफिस पार्टी किंवा हिवाळी रिसेप्शनसाठी बॉस-लेडी लूक हवा असेल, तर साडीवर लांब ओव्हरकोट किंवा फिटिंगचा ब्लेझर घाला.

Winter Wedding Fashion | agrowon

Winter Hair Care : हिवाळ्यात केस राहतील दाट, मऊ आणि कोंडामुक्त; आजच फॉलो करा 'हे' घरगुती उपाय!

Winter Hair Care | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...