Winter Hair Care : हिवाळ्यात केस राहतील दाट, मऊ आणि कोंडामुक्त; आजच फॉलो करा 'हे' घरगुती उपाय!

Anuradha Vipat

थंड हवामान

हिवाळ्यात थंड हवामानामुळे टाळू कोरडी पडते, ज्यामुळे कोंडा वाढतो आणि केसांची मुळे कमकुवत होतात.

Winter Hair Care | Agrowon

कोमट तेलाने मालिश

खोबरेल तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल कोमट करून आठवड्यातून किमान दोनदा टाळूला हलक्या हाताने मालिश करा.

Winter Hair Care | Agrowon

कोरफड जेल

ताज्या कोरफडीचा गर केसांच्या मुळांना लावून ३० मिनिटे ठेवा आणि नंतर सौम्य शाम्पूने धुवा. कोरफडीतील अँटीफंगल गुणधर्मांमुळे कोंडा कमी होतो आणि केसांना नैसर्गिक ओलावा मिळतो.

Winter Hair Care | Agrowon

दही आणि लिंबाचा रस

२-३ चमचे दह्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून टाळूला लावा आणि २० मिनिटांनी केस धुवा. दह्यामुळे केस मऊ होतात, तर लिंबातील सिट्रिक अॅसिड कोंडा साफ करण्यास मदत करते.

Winter Hair Care | agrowon

मेथी दाण्यांची पेस्ट

रात्रभर भिजवलेल्या मेथी दाण्यांची पेस्ट करून केसांच्या मुळांना लावा आणि ३० मिनिटांनी धुऊन टाका.

Winter Hair Care | agrowon

कडुलिंबाच्या पाण्याने केस धुणे

कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून ते पाणी थंड होऊ द्या आणि शाम्पू केल्यानंतर शेवटी या पाण्याने केस धुवा.

Winter Hair Care | agrowon

अतिगरम पाणी टाळा

हिवाळ्यात केसांना धुण्यासाठी कधीही खूप गरम पाणी वापरू नका; त्याऐवजी कोमट किंवा सामान्य पाण्याचा वापर करा.

Winter Hair Care | agrowon

Winter Skincare Routine : हिवाळ्यातही चेहरा चमकेल गुलाबासारखा; कोरड्या त्वचेसाठी फॉलो करा 'हे' नैसर्गिक स्किनकेअर रुटीन

Winter Skincare Routine | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...