Anuradha Vipat
हिवाळ्याचे दिवस आरोग्यासाठी महत्वाचे असतात. हिवाळ्याच्या या काळात बाजारात ताज्या आणि हिरव्या भाज्या उपलब्ध असतात.
आज आपण पाहूयात हिवाळ्यात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या भाज्या कोणत्या आहेत.
मेथी मधील लोह आणि फायबर पचनासाठी उत्तम आहे. ही भाजी हिवाळ्यात खूप लोकप्रिय आहे
मुळा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात.
वांगी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. हिवाळ्यात वांग्याचे भरीत किंवा भाजी आवर्जून खावी.
मटार भाजीमध्ये किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरल्याने शरीराला पोषण मिळते.