Deepak Bhandigare
पालकमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर प्रमाणात असते
थंडीच्या दिवसात आहारात पालकाचा समावेश केल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते
पालकाच्या भाजीसह त्याचा सूप, पराठे, चपाती, पुऱ्यांमध्ये वापर करू शकता
हिवाळ्यात मोहरीच्या कोवळ्या पानांच्या भाजीचा आस्वाद घेऊ शकता, यात अँटीऑक्सिडंट्स, फायबर भरपूर प्रमाणात असते
ही भाजी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीराला उबदार ठेवण्यास मदत करू शकते
हिवाळ्यात गाजर खावे, कारण त्यात बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, जे डोळे, त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते
मुळामध्ये असलेले घटक यकृत निरोगी ठेवतात आणि पोटाच्या तक्रारी कमी होण्यास मदत होऊ शकते
मेथीच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम आणि फायबर भरपूर असते. यामुळे रक्तातील साखरही नियंत्रित राहते