Immunity Booster Ladoo : हिवाळ्यात बनवा इम्युनिटी बूस्टर डिंकाचे आणि सुक्या मेव्याचे लाडू

Anuradha Vipat

उत्तम औषध

हिवाळ्यात शरीराला ऊब , हाडे मजबूत आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'डिंकाचे आणि सुक्या मेव्याचे लाडू' हे उत्तम औषध मानले जाते.

Immunity Booster Ladoo | agrowon

फायदेशीर

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांसाठी किंवा नवीन बाळंतपण झालेल्या महिलांसाठी हे लाडू अत्यंत फायदेशीर आहेत.

Immunity Booster Ladoo | Agrowon

साहित्य

डिंक ,काजू आणि बदाम,अक्रोड आणि पिस्ता,खारीक पावडर ,खसखस,किसलेले सुके खोबरे,गूळ,शुद्ध तूप,वेलची आणि जायफळ पावडर.

Immunity Booster Ladoo | agrowon

कृती

कढईत तूप गरम करा. त्यात डिंक छान फुलेपर्यंत तळून घ्या.तळलेला डिंक बारीक करून घ्या. तुपात काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्त्याचे काप हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.

Immunity Booster Ladoo | agrowon

खोबरे आणि खारीक

सुके खोबरे आणि खसखस मंद आचेवर हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्या. तूप घालून खारीक पावडर २-३ मिनिटे छान खमंग भाजून घ्या.

Immunity Booster Ladoo | agrowon

गुळाचा पाक

कढईत तूप गरम करा आणि त्यात बारीक चिरलेला गूळ घाला. मंद आचेवर गूळ वितळवून घ्या. वितळलेला गरम गूळ परातीमधील सर्व मिश्रणावर ओता. त्यात वेलची आणि जायफळ पावडर घाला. हाताला थोडे तूप लावून पटापट मध्यम आकाराचे लाडू वळून घ्या.

Immunity Booster Ladoo | agrowon

Open Pores Remedies : ओपन पोअर्सची समस्या कशी दूर करावी?

Open Pores Remedies | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...