Anuradha Vipat
थंडीच्या दिवसांत हवा कोरडी असल्याने त्वचेतील नैसर्गिक ओलावा झपाट्याने कमी होतो आणि त्वचा निस्तेज दिसू लागते.
अशा वेळी तुमच्या त्वचेला दिवसभर मऊ ठेवण्यासाठी योग्य बॉडी लोशन निवडताना महत्त्वाच्या घटकांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
हायलुरोनिक ॲसिड किंवा ग्लिसरीन जे हवेतील ओलावा शोषून त्वचेत टिकवून ठेवतात.
शिया बटर, कोको बटर , व्हिटॅमिन E, किंवा बदामाचे/नारळाचे तेल, जे कोरड्या आणि फाटलेल्या त्वचेला मऊ करतात.
पातळ लोशनऐवजी थोडे दाट आणि क्रीम-बेस्ड किंवा बॉडी बटर निवडा.
हिवाळ्यातही सूर्याची अतिनील किरणे त्वचेचे नुकसान करतात. त्यामुळे दिवसा वापरण्यासाठी किमान SPF 15 किंवा 30 असलेले बॉडी लोशन निवडणे फायदेशीर ठरते.
बॉडी लोशनचा सर्वाधिक फायदा मिळवण्यासाठी ते आंघोळीनंतर लगेच त्वचा थोडी ओलसर असतानाच लावावे.