Anuradha Vipat
कांदा जास्त काळ टिकण्यासाठी त्याला योग्य वातावरण आणि साठवण्याची पद्धत महत्त्वाची आहे.
हिवाळ्याच्या दिवसात कांदा जास्त काळ ताजा आणि चांगला ठेवणे तुलनेने सोपे असते
हिवाळ्याच्या दिवसात कांदा साठवण्यासाठी अशी जागा निवडा जिथे ओलावा नसेल. ओलाव्यामुळे कांदा लवकर सडतो
कांदा हवेशीर जागी ठेवल्यास तो जास्त काळ टिकतो. बंद डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवणे टाळा.
हिवाळ्यात तापमान कमी असते त्यामुळे घरातल्या थंड जागी कांदा ठेवा.
कांदा साठवण्यासाठी जाळीदार पिशवी , बांबूची बास्केट किंवा लाकडी पेटीचा वापर करा.
कांदा थेट सूर्यप्रकाशाखाली किंवा जास्त प्रखर प्रकाशात ठेवू नका. उष्णता आणि प्रकाशामुळे कांद्याला लवकर कोंब फुटतात.