Anuradha Vipat
थंड हवेमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि स्नायूंना होणारा रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे स्नायू कडक होऊन दुखू लागतात.
दुखणाऱ्या भागावर हॉट वॉटर बॅग किंवा हीटिंग पॅडने १०–१५ मिनिटे शेक द्या. यामुळे रक्ताभिसरण वाढून स्नायू सैल होतात.
दिवसाची सुरुवात किंवा झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ केल्यास अंगदुखी आणि स्नायूंचा ताण लगेच कमी होतो.
थेट थंड हवा लागू नये म्हणून सुती कपड्यांवर लोकरीचे कपडे आणि पायात मोजे घाला.
थंडीत एकाच जागी जास्त वेळ बसून राहिल्याने स्नायू अधिक आखडतात. घरातच चालणे, सूर्यनमस्कार किंवा हलका व्यायाम केल्याने स्नायू लवचिक राहतात.
कोमट तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाने स्नायूंना हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा आणि स्नायूंमध्ये उष्णता निर्माण होते.
व्हिटॅमिन-डी साठी सकाळी कोवळ्या उन्हात बसा. आहारात हळद, आले, लसूण, सुका मेवा आणि तीळ यांसारख्या उष्ण व दाहक-विरोधी पदार्थांचा समावेश करा.