Anuradha Vipat
थंडीच्या दिवसांत शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी ऊर्जा निर्माण करण्याची गरज वाढते.
थंडीच्या दिवसांत शरीरातील चयापचय क्रिया वेगवान होते आणि परिणामी भूक व पचनशक्ती वाढते.
बाहेरील थंड हवेमुळे त्वचेवरील सूक्ष्म रंध्रे आकुंचन पावतात. त्यामुळे शरीरातील नैसर्गिक उष्णता बाहेर पडू शकत नाही आणि ती पोटाच्या भागात एकवटते.
पोटातील उष्णता वाढल्यामुळे अन्न पचवणारा 'जठराग्नी' अधिक प्रखर होतो.
बाहेरील तापमान कमी असताना शरीराला आतील तापमान (सुमारे ३७°C) स्थिर ठेवण्यासाठी जास्त काम करावे लागते.
शरीरातील उष्णता टिकवण्यासाठी जास्त कॅलरीज जाळल्या जातात. या ऊर्जेची भरपाई करण्यासाठी मेंदूकडून भुकेचे संकेत दिले जातात .
जठराग्नी प्रबळ असल्यामुळे या दिवसांत पोट जास्त वेळ रिकामे ठेवू नका; अन्यथा तो अग्नी शरीरातील धातूंना क्षीण करू शकतो किंवा ॲसिडिटी होऊ शकते.