Anuradha Vipat
हिवाळ्याच्या दिवसांत रात्री झोपताना किंवा पहाटेच्या वेळी पायांमध्ये अचानक तीव्र वेदना होऊन 'गोळे येणे' ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे.
थंडीमुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे पायांच्या स्नायूंना पुरेसा रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन मिळत नाही यामुळे स्नायू आखडून गोळे येतात.
हिवाळ्यात तहान कमी लागत असल्याने अनेकजण कमी पाणी पितात. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास स्नायूंमध्ये पेटके येण्याचा धोका वाढतो.
शरीरात मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D यांसारख्या खनिजांची कमतरता असल्यास स्नायू कमकुवत होतात आणि थंडीत गोळे येतात.
पायांवर थेट थंड वारा लागल्यास किंवा पाय उघडे राहिल्यास स्नायू अचानक आकुंचन पावतात.
तिळाचे तेल, मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल कोमट करून पायांना आणि पोटऱ्यांना हलक्या हाताने मसाज करा. यामुळे स्नायूंना ऊब मिळते.
रात्री झोपताना पायात सुती किंवा लोकरीचे सैल मोजे घाला, जेणेकरून पायांना थंडी लागणार नाही.