Anuradha Vipat
हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात ओठ फाटणे ही एक सामान्य समस्या आहे.
थंड आणि कोरड्या हवेमुळे ओठांमधील ओलावा कमी होतो ज्यामुळे ते कोरडे पडून फाटतात.
सॉफ्ट आणि गुलाबी ओठांसाठी तुम्ही आम्ही दिलेल्या खालील सोप्या आणि प्रभावी टिप्स फॉलो करू शकता
रात्री झोपण्यापूर्वी जाडसर लिप बाम किंवा व्हॅसलीन लावा. रात्रभर ओठांना पोषण मिळते आणि ओलावा टिकून राहतो.
शरीरात पाण्याची कमतरता हे ओठ फाटण्याचे मुख्य कारण आहे. दिवसभर पुरेसे पाणी प्या.
जेव्हा ओठ कोरडे वाटतात, तेव्हा आपण नकळत त्यांना जिभेने चाटतो. असे केल्याने ओठ अधिक कोरडे आणि फाटतात
ओठांवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एक्सफोलिएशन करा.