Anuradha Vipat
तुम्हाला कोबीची भाजी आवडत नसली तरी या 'मसाला कोबी' पद्धतीने बनवल्यास नक्कीच आवडीने खाल!
'मसाला कोबी' ही भाजी चवीला खूप छान लागते आणि करायलाही सोपी आहे.
कोबी, कांदा, टोमॅटो, आलू, आले-लसूण पेस्ट , हिरवी मिरची , तेल, मोहरी, जीरे, हिंग, हळद, लाल तिखट, धने-जीरे पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ गार्निशसाठी ताजी कोथिंबीर, ओले खोबरे.
कोबी आणि बटाट्याच्या फोडी स्वच्छ धुवून गरम तेलात मोहरी आणि जीरे हिंग आणि हळद घालून परतून घ्या
बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून कांदा परतून घ्या. आले-लसूण पेस्ट घालून टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवा.
बटाट्याच्या फोडी थोडे पाणी घालून बटाटे अर्धे शिजवून घ्या बटाटे अर्धे शिजल्यावर बारीक चिरलेली कोबी घाला. सर्व मसाले घालून चांगले मिसळा.
कोबी मंद आचेवर शिजू द्या. कोबी आणि बटाटा पूर्ण शिजल्यावर वरून ताजी कोथिंबीर आणि हवे असल्यास ओले खोबरे घालून सजवा.