Anuradha Vipat
थंडीच्या दिवसांत शरीराला घाम कमी येतो आणि तहानही कमी लागते.
पाणी कमी प्यायले गेल्याने लघवी घट्ट होते आणि किडनीमध्ये कॅल्शियम व इतर क्षार साचून मुतखडा तयार होण्याचा धोका वाढतो.
हिवाळ्यात तहान लागत नसली तरी दिवसभरात किमान २.५ ते ३ लिटर पाणी पिण्याची सवय लावा.
हिवाळ्यात आपण अनेकदा खारट पदार्थ, पापड, लोणचे किंवा प्रोसेस्ड फूड जास्त खातो. जास्त मीठामुळे लघवीत कॅल्शियमचे प्रमाण वाढून स्टोन तयार होतात.
लिंबू पाणी, संत्री, मोसंबी यांसारख्या फळांमध्ये 'सायट्रेट' असते, जे किडनीमध्ये खडे तयार होण्यास प्रतिबंध करते.
थंडीत पाण्यासोबतच घरगुती भाज्यांचे सूप, ताक किंवा नारळपाणी घेतल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते
थंडी घालवण्यासाठी दिवसभरात खूप जास्त चहा किंवा कॉफी प्यायल्याने शरीरातील पाणी कमी होते आणि ऑक्सलेटचे प्रमाण वाढू शकते.