Winter Joint Pain Care : हिवाळ्यात वृद्धांच्या सांधेदुखीची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या ५ सोपे उपाय

Anuradha Vipat

रक्ताभिसरण

हिवाळ्यात थंडीमुळे रक्ताभिसरण मंदावते आणि सांध्यांमधील वंगण घट्ट होते.

Winter Joint Pain Care | Agrowon

सांधेदुखी

वृद्धांमध्ये सांधेदुखी आणि आखडलेपणा वाढतो. अशा वेळी त्यांच्या सांध्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Winter Joint Pain Care | Agrowon

थरांमध्ये कपडे

स्वेटर घालण्याऐवजी थर्मल इनरवेअरसह कपड्यांचे एकापेक्षा जास्त थर घालावेत. यामुळे शरीराची उष्णता कोंडून राहते.

Winter Joint Pain Care | Agrowon

मोजे आणि वॉर्मर

थंड हवा थेट सांध्यांना लागू नये म्हणून पायात आणि हातात मोजे तसेच गुडघ्यांसाठी 'नी वॉर्मर' वापरावेत.

Winter Joint Pain Care | Agrowon

हॉट पॅक थेरपी

सांधे जास्त आखडले असल्यास हीटिंग पॅड किंवा गरम पाण्याच्या पिशवीने १०-१५ मिनिटे शेक द्यावा.

Winter Joint Pain Care | agrowon

कोमट तेलाने मसाज

तीळ किंवा मोहरीचे तेल हलके कोमट करून सांध्यांवर हलक्या हाताने मालिश करावी.

Winter Joint Pain Care | agrowon

कोवळ्या उन्हात बसा

थंडीच्या दिवसांत सूर्यप्रकाश कमी असतो. सकाळी ८ ते १० दरम्यान वृद्धांना किमान २० मिनिटे कोवळ्या उन्हात बसवावे.

Winter Joint Pain Care | agrowon

Breast Milk For Newborn : नवजात बालकांसाठी आईचे दूध का आहे अमृत? जाणून घ्या स्तनपानाचे फायदे

Breast Milk For Newborn | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...