Anuradha Vipat
नवजात बालकांच्या वाढीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आईचे दूध हे अमृत मानले जाते.
आईचे दूध बाळाला पहिल्या ६ महिन्यांत सर्व आवश्यक पोषक घटक आणि रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करते.
बाळाच्या जन्मानंतरचे पहिले ६ महिने त्याला केवळ आणि केवळ आईचेच दूध दिले पाहिजे.
बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीचे २-३ दिवस आईला येणारे घट्ट, पिवळसर दूध अत्यंत महत्त्वाचे असते.
पहिल्या २-३ दिवस आईला येणाऱ्या दूधामध्ये अँटीबॉडीज भरपूर प्रमाणात असतात, जे बाळासाठी पहिल्या नैसर्गिक लसीसारखे काम करतात.
आईच्या दुधामुळे बाळाचे न्यूमोनिया, अतिसार , कान आणि छातीचे इन्फेक्शन यांसारख्या गंभीर आजारांपासून रक्षण होते.
आईच्या दुधात असणारे प्रथिने आणि फॅट्स बाळाची कच्ची पचनसंस्था सहज पचवू शकते.