Winter Joint Pain : हिवाळ्यात सांधेदुखीपासून सुटका मिळवण्याचा उपाय

Anuradha Vipat

सांधेदुखी

हिवाळ्यात हवेतील तापमान कमी झाल्यामुळे आणि रक्ताभिसरण मंदावल्यामुळे सांधेदुखी आणि सांध्यांचे कडकपण वाढते.

Winter Joint Pain | Agrowon

रक्ताभिसरण

थंडीमुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे सांध्यांपर्यंत रक्ताभिसरण नीट होत नाही

Winter Joint Pain | Agrowon

लसूण आणि मोहरीचे तेल

४ ते ५ चमचे मोहरीच्या तेलात लसणाच्या ३-४ पाकळ्या ठेचून टाका. तेल चांगले उकळून घ्या. हे तेल कोमट करून सांध्यांवर हलक्या हाताने मालिश करा.

Winter Joint Pain | agrowon

आयुर्वेदिक तेल

तिळाचे तेल, महानारायण तेल किंवा विषगर्भ तेल कोमट करून लावल्याने सांध्यातील 'वात दोष' कमी होतो आणि वेदना थांबतात.

Winter Joint Pain | Agrowon

शेक देणे

मालिश केल्यानंतर सांध्यांना शेक दिल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि कडकपणा दूर होतो.

Winter Joint Pain | Agrowon

मेथी दाणे

रात्री १ चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत घाला. सकाळी उठून ते पाणी प्या आणि मेथी दाणे चावून खा. हे सांधेदुखीवर रामबाण औषध मानले जाते.

Winter Joint Pain | agrowon

सुंठ आणि हळदीचे दूध

रात्री झोपताना दुधात अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा सुंठ पावडर टाकून उकळून प्या. हळद आणि सुंठ यामध्ये नैसर्गिक 'अँटी-इन्फ्लेमेटरी' गुणधर्म असतात.

Winter Joint Pain | agrowon

Mental Fatigue Cure : सतत येणाऱ्या मानसिक थकव्यावर काय आहे उत्तम औषध? जाणून घ्या आयुर्वेदातील सर्वोत्तम तोडगे

Mental Fatigue Cure | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...