Winter Itchy Skin Relief : थंडीत शरीराला खाज सुटते किंवा अंगावर चट्टे उठतात? करा हे सोपे आणि प्रभावी उपाय!

Anuradha Vipat

हवेतील आर्द्रता

थंडीच्या दिवसांत हवेतील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी होऊन खाज सुटते किंवा लाल चट्टे उठतात.

Winter Itchy Skin Relief | agrowon

कोमट तेलाने मसाज

अंघोळीपूर्वी १५–२० मिनिटे आधी खोबरेल तेल, तिळाचे तेल किंवा बदामाच्या तेलाने शरीराला हलका मसाज करा.

Winter Itchy Skin Relief | Agrowon

अंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर

अंघोळ झाल्यानंतर त्वचा पूर्णपणे कोरडी न पुसता, ती किंचित ओलसर असतानाच जाडसर मॉइश्चरायझर, शिया बटर, पेट्रोलियम जेली किंवा सेरामाइड युक्त लोशन लावा.

Winter Itchy Skin Relief | Agrowon

कडकडीत गरम पाणी टाळा

जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेचे नैसर्गिक तेल नष्ट होते आणि खाज वाढते. त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा.

Winter Itchy Skin Relief | agrowon

सौम्य साबण वापरा

केमिकल्स किंवा जास्त सुगंध असलेले साबण व बॉडी वॉश टाळा. त्याऐवजी ग्लिसरीनयुक्त साबण, ओटमील बाथ किंवा मॉइश्चरायझिंग क्लींजर वापरा.

Winter Itchy Skin Relief | agrowon

सुती कपड्यांचा थर

लोकरीचे किंवा सिंथेटिक कपडे थेट अंगावर घातल्याने त्वचेला ॲलर्जी व खाज सुटू शकते. त्यामुळे आधी मऊ सुती कपडे घाला आणि त्यावर स्वेटर घाला.

Winter Itchy Skin Relief | agrowon

पुरेसे पाणी प्या

थंडीत तहान कमी लागत असली तरी शरीर आतून हायड्रेट राहण्यासाठी दिवसभर कोमट पाणी पीत राहा.Winter Morning Routine : थंडीत सकाळी पांघरूण सोडावंसं वाटत नाही? आळस झटकून लवकर उठण्यासाठी 'या' सवयी नक्की पाळा!

Winter Itchy Skin Relief | Agrowon

Winter Morning Routine : थंडीत सकाळी पांघरूण सोडावंसं वाटत नाही? आळस झटकून लवकर उठण्यासाठी 'या' सवयी नक्की पाळा!

Winter Morning Routine | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...