Anuradha Vipat
थंडीच्या दिवसांत उबदार पांघरूण सोडून सकाळी लवकर उठणे कठीण वाटणे स्वाभाविक आहे.
झोपण्याच्या वेळेचे नियोजन, अलार्मची योग्य जागा आणि सकाळची कोवळी सूर्यकिरणे या सवयींच्या मदतीने तुम्ही आळस सहज झटकू शकता.
अलार्म खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात ठेवल्यास तो बंद करण्यासाठी तुम्हाला अंथरुणातून बाहेर पडावेच लागेल, ज्यामुळे झोप आपोआप उडते.
डोळे उघडल्याबरोबर खोलीतील पडदे बाजूला करा. सकाळच्या नैसर्गिक प्रकाशामुळे मेंदूतील झोप आणणारे 'मेलाटोनिन' नावाचे हार्मोन कमी होते आणि शरीराला दिवस सुरू झाल्याचा संदेश मिळतो.
सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाईल आणि टीव्हीचा वापर बंद करा.
उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान संतुलित होते आणि पचनसंस्था व मेंदू लगेच सक्रिय होतात.
सकाळी उठल्यावर करायला आवडेल अशी एखादी गोष्ट ठरवून ठेवा; जसे की गरमागरम चहा किंवा कॉफीचा आस्वाद घेणे, आवडते संगीत ऐकणे किंवा १० मिनिटे हलका व्यायाम करणे.