Team Agrowon
हिवाळा हा म्हशींच्या प्रजननासाठी सर्वांत अनुकूल ऋतू मानला जातो. राज्यातील हवामान, हिवाळ्यातील सौम्य तापमान आणि उष्णतेचा अभाव हे घटक प्रजननासाठी पोषक ठरतात.
पशुपालकांनी या ऋतूचा योग्य फायदा घेण्यासाठी ठराविक योजना आखून काम करणे आवश्यक आहे.
सरासरीपेक्षा कमी तापमान, थंडीचा कालावधी, पाण्याची उपलब्धता, मुबलक हिरवा आणि वाळलेला चारा, हवेतील मध्यम आर्द्रता अशा वातावरणामुळे हिवाळा म्हशींच्या आरोग्य व प्रजननास हितावह ठरतो.
हिवाळ्याच्या ३ ते ४ महिन्यांत आपल्याकडील प्रत्येक म्हशीचे प्रजनन सुरू आहे किंवा नाही याबाबत पशुपालकांनी जागरूक असावे.
हिवाळ्यातील कमी उष्णता आणि सौम्य थंड हवामानामुळे म्हशींच्या शरीरातील उष्णता नियमन सुरळीत होते. हे प्रजननासाठी पोषक वातावरण निर्माण करते.
हिवाळ्यात उष्णतेमुळे होणारा तणाव टाळला जातो. त्यामुळे म्हशींच्या प्रजनन क्षमतेत वाढ होते.
हिवाळ्यातील भरपूर चारा व पोषणमूल्ये युक्त आहारामुळे जनावरांची आरोग्यस्थिती सुधारते. प्रजननानंतर गाभण म्हशींच्या शरीरात हार्मोन्सची वाढ होते. त्यामुळे अधिक दूध उत्पादन शक्य होते.