sandeep Shirguppe
दैनंदिन खाद्यपदार्थात चिंचेचा वापर केल्यास त्याचे आरोग्यालाही अनेक फायदे आहेत.
लोह, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए यांसारखे पोषक घटक चिंचेत असतात.
चिंचेमध्ये लोह अधिक प्रमाणात असते. त्यामुळे चिंचेचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास अशक्तपणा दूर होतो.
चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासही मदत होते.
चिंचेमध्ये हाइड्रोसिट्रिक अॅसिड असल्याने, शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित करण्यासाठीही चिंच फायदेशीर असते.
लोह आणि पोटॅशियमचं प्रमाण अधिक असल्याने ब्लड प्रेशर नियमित करण्यासाठीही चिंच फायदेशीर आहे.
प्राचीन काळापासून चिंचेचा वापर हा पाचक रुपात केला जातो. चिंचेच्या सेवनाने पोटाशी संबंधित विकार दूर होतात.