Winter Sleep Tips : कडाक्याच्या थंडीत झोप उडतेय? वाचा झोपेचे रामबाण उपाय!

Anuradha Vipat

झोप विस्कळीत होते

हिवाळ्यात थंड हवा, कमी सूर्यप्रकाश आणि बदलत्या दिनचर्येमुळे अनेकांची रात्रीची झोप विस्कळीत होते किंवा झोप पूर्ण होत नाही.

Winter Sleep Tips | Agrowon

सुखाची झोप

कडाक्याच्या थंडीत शांत, गाढ आणि सुखाची झोप मिळवण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणते सोपे बदल करावेत, ते जाणून घ्या.

Winter Sleep Tips | Agrowon

झोपण्यापूर्वी अंघोळ करा

झोपण्याच्या ३० ते ४५ मिनिटे आधी कोमट पाण्याने अंघोळ केल्यास शरीराचे तापमान संतुलित होते आणि स्नायूंना आराम मिळतो.

Winter Sleep Tips | agrowon

झोपताना पायात मोजे घाला

थंडीमुळे तळपाय गार पडल्यास झोप लागत नाही किंवा मध्यरात्री जाग येते. झोपताना सुती किंवा मऊ लोकरीचे मोजे घातल्याने पाय उबदार राहतात.

Winter Sleep Tips | Agrowon

कोवळ्या उन्हात बसा

हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने शरीरातील 'मेलाटोनिन' चक्र बिघडते. सकाळच्या उन्हात बसल्याने शरीराचे नैसर्गिक घड्याळ सुधारते आणि रात्री चांगली झोप येते.

Winter Sleep Tips | Agrowon

हळदीचे दूध

झोपण्यापूर्वी एक कप कोमट हळदीचे दूध किंवा जायफळ घातलेले दूध प्यायल्याने शांत झोप लागते.

Winter Sleep Tips | Agrowon

हलक्या कपड्यांचे थर वापरा

खूप जड रजाई घेतल्याने मध्यरात्री गरम होऊन घाम येतो आणि झोप मोडते. त्याऐवजी हलके ब्लँकेट आणि सुती चादर असे थर वापरल्यास तापमान आल्हाददायक राहते.

Winter Sleep Tips | agrowon

Winter Lip Care : थंडीत ओठ फुटण्याची समस्या सतावतेय? रात्री झोपताना लावा 'हा' घरगुती पदार्थ

Winter Lip Care | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...