Anuradha Vipat
ओठांची त्वचा अत्यंत नाजूक असते आणि त्यामध्ये तेलग्रंथी नसतात, त्यामुळे हिवाळ्यातील कोरड्या वाऱ्यामुळे ओठ लवकर कोरडे पडून फुटतात.
रात्री झोपण्यापूर्वी बोटावर १-२ थेंब कोमट तूप घेऊन ओठांवर हलक्या हाताने मसाज करा.
ताज्या दुधाची साय ओठांवर लावून रात्रभर तशीच राहू द्या. यातील लॅक्टिक अॅसिडमुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाते आणि ओठांचा काळपटपणाही कमी होतो.
मधात अँटीबॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. फुटलेल्या ओठांवर थोडे मध लावल्यास ओलावा टिकून राहतो.
रात्री झोपताना ओठांवर आणि बेंबीत २ थेंब कोमट खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल लावणे हा पारंपारिक आणि अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो.
जर ओठ खूप जास्त फुटून दुखत असतील, तर ताज्या कोरफडीचा गर लावल्याने थंडावा मिळतो आणि त्वचा लवकर बरी होते.
ओठ कोरडे वाटल्यावर वारंवार लाळ लावल्याने ओलावा अधिकच उडून जातो आणि ओठ जास्त फाटतात.