Anuradha Vipat
थंडीच्या दिवसांत तापमान कमी झाल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब अचानक वाढण्याचा धोका निर्माण होतो.
हिवाळ्यात हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सोपे व प्रभावी उपाय येथे जाणून घ्या.
एकदम थंड हवेत जाणे टाळा. एका जाड जॅकेटऐवजी स्वेटर, थर्मल आणि मफलर असे कपड्यांचे थर घाला.
सकाळी लवकर आणि रात्री उशिरा थंडीचा कडाका जास्त असतो. त्यामुळे पहाटे मॉर्निंग वॉकला जाण्याऐवजी ऊन पडल्यानंतर फिरायला जा.
आहारात मीठ, लोणचे, पापड आणि प्रोसेस्ड पदार्थ कमी खा. हिवाळ्यात मिळणाऱ्या हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट, लसूण आणि संत्री यांसारख्या फळांचा समावेश करा.
थंडीत तहान कमी लागत असल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे रक्त घट्ट होऊन बीपी वाढू शकतो.
हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने शरीरातील व्हिटॅमिन-डी कमी होते, ज्याचा परिणाम रक्तदाबावर होतो. दररोज सकाळी १५ ते २० मिनिटे कोवळ्या उन्हात बसा.