Winter Gardening : हिवाळ्यात तुमची बाल्कनी फुलांनी बहरून जाईल! कमी जागेत नक्की लावा 'ही' सुंदर फुलांची रोपे

Anuradha Vipat

हवामान आणि ऊन

थंड हवामान आणि कोवळ्या उन्हात काही रोपे भरभरून फुलतात आणि कमी जागेत कुंड्यांमध्येही सहज वाढतात.

Winter Gardening | agrowon

पिटुनिया

हँगिंग बास्केट्स आणि बाल्कनीच्या रेलिंगसाठी पिटुनिया हे सर्वात आकर्षक रोप आहे. गुलाबी, जांभळा, पांढरा आणि लाल अशा अनेक रंगांची फुले संपूर्ण हिवाळाभर बाल्कनीची शोभा वाढवतात

Winter Gardening | agrowon

शेवंती

हिवाळी बागेची राणी म्हणून ओळखली जाणारी शेवंती पिवळ्या, पांढऱ्या, गुलाबी आणि जांभळ्या रंगांत उपलब्ध असते.

Winter Gardening | agrowon

पॅन्सी

फुलपाखरासारख्या पाकळ्या असलेली पॅन्सीची फुले बाल्कनीला अत्यंत सुंदर लूक देतात. हे रोप लहान कुंड्यांमध्येही सहज वाढते आणि याला फारशा देखभालीची गरज नसते.

Winter Gardening | agrowon

झेंडू

पिवळ्या आणि केशरी रंगाचा झेंडू लावणे अत्यंत सोपे आहे. झेंडूच्या फुलांमुळे बाल्कनीला पारंपरिक आणि प्रसन्न लूक मिळतो, तसेच याच्या सुगंधामुळे इतर रोपांवर कीडही येत नाही.

Winter Gardening | agrowon

कॅलेंडुला

सूर्यप्रकाशात उमलणारी कॅलेंडुलाची नारंगी आणि पिवळी फुले थंडीत बागेत उबदारपणा आणतात. कमी पाण्यात आणि सामान्य मातीतही हे रोप खूप चांगले वाढते.

Winter Gardening | agrowon

सूर्यप्रकाश

फुलांची चांगली वाढ होण्यासाठी कुंड्या अशा ठिकाणी ठेवा जिथे रोज किमान ३-४ तास कोवळे ऊन येईल.

Winter Gardening | agrowon

Woolen Clothes Care : हिवाळ्यात लोकरीचे कपडे स्वच्छ आणि मऊ ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स; स्वेटर राहतील एकदम नव्यासारखे!

Woolen Clothes Care | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...