Winter Heart Care : हिवाळ्यात पहाटे हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक का असतो?

Anuradha Vipat

काम

शरीराची उष्णता टिकवून ठेवण्यासाठी हृदयाला अधिक वेगाने आणि जास्त दाबाने काम करावे लागते.

Winter Heart Care | Agrowon

रक्तवाहिन्या अरुंद होणे

थंड हवेमुळे शरीरातील उष्णता बाहेर जाऊ नये म्हणून रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो आणि रक्तदाब वाढतो.

Winter Heart Care | Agrowon

रक्त घट्ट होणे आणि गुठळ्यांची शक्यता

थंड वातावरणात रक्तातील प्लेटलेट्स अधिक सक्रिय होतात, ज्यामुळे रक्त घट्ट होते आणि रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो.

Winter Heart Care | Agrowon

पहाटेच्या वेळी सर्वाधिक धोका

पहाटे तापमान सर्वात कमी असते आणि सकाळी उठल्यावर शरीरात 'कॉर्टिसोल' व 'अॅड्रेनालाईन' या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढते. यामुळे पहाटे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण जास्त असते.

Winter Heart Care | Agrowon

जीवनशैली आणि आहारातील बदल

हिवाळ्यात शारीरिक हालचाल व व्यायाम कमी होतो, तर तेलकट, खारट आणि गोड पदार्थांचे सेवन वाढते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि हृदयावरील ताण वाढतो.

Winter Heart Care | Agrowon

श्वसनाचे संसर्ग

थंडीत फ्लू, सर्दी किंवा न्यूमोनियासारख्या संसर्गामुळे शरीरात सूज येते, ज्याचा थेट ताण हृदयावर पडतो.

Winter Heart Care | Agrowon

शरीर उबदार ठेवा

बाहेर पडताना थराथरांचे कपडे, कानटोपी, मफलर आणि हातमोजे घाला. डोके, कान आणि पाय झाकलेले ठेवणे गरजेचे आहे.

Winter Heart Care | Agrowon

Winter Fashion Trends : यंदाच्या हिवाळ्यात 'हे' जॅकेट्स आहेत प्रचंड ट्रेंडमध्ये; थंडीपासून बचावासोबतच मिळवा स्टायलिश लूक!

Winter Fashion Trends | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...